Posts

Showing posts from 2018

तुकोबा

Image
डोळ्यात निराळी भाषा भाषेत उन्हाचे रंग रणरणत्या माळावरती तू कोंबासंगे दंग भेगाळ भुईगत टाचा रापले, सायीचे अंग कैवल्य कवडश्यांमधुनी तव उजळे पांडुर रंग सुधींद्र दि. देशपांडे  |  www.sudhindradeshpande.com Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger × Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Rephrase Rephrase current sentence Edit in Ginger ×

नाहीच कुणी आपले रे, प्राणांवर नभ धरणारे...

Image
प्रिय बाबा, आज कोजागरी पौर्णिमा, तुझा वाढदिवस म्हणून तुला लिहायला बसलो, खरं तर तुला फोन कॉलच करणार होतो पण, तो काय तुला नेहमीप्रमाणे ऐकायला आला नसता म्हणून हा लेखनप्रपंच. कोजागरीला म्हणायचास "माझा वाढदिवस सगळं लातूर सिलिब्रेट करतं" आणि मग तेला-पाण्याचा हात केसांवरून फिरवून, गदिमा स्टाईल भांग पाडून.. सगळ्यांना पार्टि देण्यासाठी तुझ्या त्या फेमस कचोरी आणि 'ळभे'चं आंबटगोड पाणी बनवायला घ्यायचास..काय प्रचंड टेस्टी असायचं रे ते!! आज भेळ खाताना पहिल्याच घासाला ठसका का लागला कोणास ठाऊक... मी आज असा एकदम एकेरीत बोलतोय म्हणून काही नजरा चपापुन एकमेकांकडे बघत असतील पण तुला त्याचं नक्कीच काही वाटलं नसणार. हो ना!? तसा मित्रच की तू माझा, अगदी तुझी चप्पल माझ्या पायाला येण्याच्याही आधीपासूनचा...एका हातानं बापपणाचं आभाळ तोलून धरतानाच दुसऱ्या आश्वस्त हातानं मला सावरणारा... माझ्या मित्रा, आज तुला लिहायला बसलोय खरा पण काय लिहू? कोणत्या मापानं मोजू उंची तुझी? लौकिक व्यवहाराच्या मापानं तुझी उंची मोजणं म्हणजे तुझ्यावर अन्यायच ठरेल आणि तुझ्या उंचीची अलौकिकाची मापं आणायची कोठून? तु...

हिरवी ओळ...!!

मावळत्या जांभ घनांसम तु नित्य सुखाचे देणे, मी कुशीत घेऊन निजतो दु:खाचे प्रेमळ गाणे ! या जगण्याच्या ओढ्याला ‘काहीच नसण्याचे’ पूर तुज दारी बरसत तेंव्हा; बिस्मिल्लाचे वेडे सुर !! घेतल्यास तू चुंबुनी जेंव्हा कवितेच्या ओळी ओल्या... श्वासांतून झरली मुरली; गात्रांतुनी गोपी आल्या !! झाडांतूनी गर्दशी उठली, ती माझीच हिरवी ओळ... हे सरता संपत नाही; ग्रेस...अन, संध्याकाळ...!!   सुधींद्र दि. देशपांडे  |  www.sudhindradeshpande.com Enable Ginger Cannot connect to Ginger Check your internet connection or reload the browser Disable in this text field Edit Edit in Ginger Edit in Ginger ×