तुकोबा
डोळ्यात निराळी भाषा
भाषेत उन्हाचे रंग
रणरणत्या माळावरती
तू कोंबासंगे दंग
भाषेत उन्हाचे रंग
रणरणत्या माळावरती
तू कोंबासंगे दंग
भेगाळ भुईगत टाचा
रापले, सायीचे अंग
कैवल्य कवडश्यांमधुनी
तव उजळे पांडुर रंग
रापले, सायीचे अंग
कैवल्य कवडश्यांमधुनी
तव उजळे पांडुर रंग
सुधींद्र दि. देशपांडे | www.sudhindradeshpande.com

Comments